कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत तिच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6101 ने कमी झाली आहे.

मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने इन्फोसिसने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल गुरूवारी 11 जानेवारी रोजी जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 7.3 टक्क्यांनी घट झाली आहे. या तिमाहीत इन्फोसिसला 6,106 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 6,586 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

इन्फोसिस 11 जानेवारी रोजी नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की, कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर 1.7 टक्के घट झाली आहे. तर डिसेंबर तिमाहीत एकत्रित महसूल 1.3 टक्क्यांनी वाढून 38,821 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत महसूल 38,318 कोटी रुपये होता.. शेअर्स किरकोळ वाढीने बंद झाले