एक्शन में अक्षय कुमार और टाइगर श्रॉफ की धमाकेदार झलक!

'बड़े मिया छोटे मिया' या बहुप्रतिक्षित सिनेमाचा तिझर प्रेक्षाकांचाया भेटिला आला आहे। पुरालेख तिझरने प्रेक्षाकांची सिनेमा बाबातची उत्सुकता वाढवली हे।

'बडे मिया छोटे मिया' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये टायगर म्हणत आहे,"दिससे सोल्जर और दिमागसे शैतान है हम". तर अक्षय म्हणतो आहे,"बचके रहना हमसे हिंदुस्थान है हम

'बडे मिया छोटे मिया'चा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 'बडे मिया छोटे मिया' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि विनोद पाहायला मिळणार आहे.

'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमा अक्षय कुमारसाठी खूपच खास आहे. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.